भीमाशंकरला जाताना विसावा....
एकदा पावसाळा सुरू झाला की अनेक पर्यटक कोकणातील विविध धबधब्यावर निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जात असतात. अनेक हौशी पर्यटक आणि ट्रेकर या काळात भीमाशंकर चा रस्ता पकडतात. भीमाशंकरला जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत त्यापैकी खांडस भागातून गणपती घाट घोगराळ आणि शिडीचा घाट असे तीन पर्याय आहेत. याशिवाय पावली चा घाट आणि बैल घाट हेसुद्धा पर्याय आहेत. निसर्गाशी नातं जोडत डोंगरातून या मळलेल्या वाटेने जाताना जो आनंद येतो तो वर्णन करण्यापलीकडे आहे. वाटेत लागणारा पदरगड हे सुद्धा पर्यटकांचे एक फार मोठे आकर्षण आहे. फक्त पावसाळाच नाही तर जवळपास वर्षभर या वाटेने जाणारे आणि निसर्गाचा आनंद लुटणारी लोक आपल्याला पाहायला मिळतील. या संपूर्ण रस्त्यात अतिशय दाट जंगल आणि पावसाळ्याच्या दिवसात नयनरम्य धबधबे पाहून मन थक्क होते. रस्त्याने पर्यटक या धबधब्याचा आनंद लुटत मार्गक्रमण करतात.
पदरगड सोडला किंवा शिडी घाट वर चढून आलं की एक आठ-दहा घरांची वस्ती लागते. भीमाशंकरच्या पदराला किंवा पदरगडाच्या शेजारी असणाऱ्या वस्तीला पदर वाडी असे नाव आहे. पदर वाडी हे ठिकाण भीमाशंकरला जाण्याचा शेवटचा टप्पा म्हणता येईल.
पदर वाडीत अनेक पर्यटक विसावा घेण्यासाठी थांबतात. निसर्गानं भरभरून दिलेल्या वाडीत थांबणं हे प्रत्येकाच्याच नशिबात नसतं. घाईत येणाऱ्या माणसाला तो आनंद मिळत नाही. पदर वाडी मधील काही कुटुंबांनी या पर्यटकांच्या सोयीसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून ठेवली आहे. यातील महत्त्वाचं नाव म्हणजे श्री गवारी सर. त्यांनी मोठे हॉल, रूम्स, तंबू यांची व्यवस्था केली आहे. त्यांच्याकडील तंबू तुम्ही अगदी पावसाळ्यात बाहेर झोपण्याचा आनंद मिळवून देणारे आहेत. एका तंबूत तीन ते चार लोक राहू शकतात.
त्याच प्रमाणे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात या टेन्टमध्ये निसर्गात झोपण्याचा जो आनंद आहे तो घेता येतो. सोबतच श्री गवारी यांनी येणाऱ्या पर्यटकांची राहण्या सोबतच खाण्याची सोय केलेली आहे. मस्त चुलीवरच्या खमंग जेवण पर्यटक त्यांच्या आवडीनुसार याठिकाणी घेऊ शकतात. या ठिकाणी रात्रीचा केलेला मुक्काम म्हणजे एक पर्वणीच. पावसाळ्याव्यतिरिक्त अन्य दिवसात तर निसर्गाचं मनोहारी दर्शन विविध रूपांनी दिसतंच पण पावसाळ्यातील वर्णन तर अवर्णनीयच. भीमाशंकरच्या कड्यावरून वाहणारे धबधबे, खळखळ खळखळ वाहणारे पाणी, लोकांचा हर हर महादेव चा गजर आणि निसर्गाने पांघरून घातलेली हिरवी शाल अशा वातावरणात पहाटे उठल्यानंतर पक्षांचा ऐकू येणारा किलबिलाट, पहाटेचे अल्हाददायक वातावरण, थंडगार हवा मनाला एक वेगळीच प्रसन्नता आणि उभारी देऊन जाते. तुम्ही जर या भागात जाणार असाल तर निश्चितपणे याठिकाणी थांबायचा प्लॅन करूनच या कारण हा आनंद जीवनातील परमोच्च आनंद असल्याचे तुम्हाला खात्री होईल. आपल्या राज्याचा राज्य प्राणी शेकरू तुम्हाला याच जंगलात पहायला मिळेल. सकाळी समोर दिसणारी नागफणी आणि त्यावर धक्के देणारी धुक्याची व ढगांची चादर व गुंजारव करणारा वारा असे स्तिमित करणारे दृश्य किती वेळा डोळ्यात भरून ठेवावे आणि किती वेळा परत परत आपण त्या ठिकाणी जावे असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. नदीवर किंवा विहिरीवर आंघोळ करण्याचा आनंदही याठिकाणी आपल्याला घेता येतो. तेव्हा आपण कधीही भीमाशंकरला जाल, पदर गडावर जाल, तर पदरवाडीत एक मुक्काम करण्याचं निश्चित करूनच जा. आणि गवारी सरांच्या आदरतिथ्याचा लाभ घेण्यास विसरू नका. श्री. गवारी सर मोबाईल नंबर +91 86899 10333
धन्यवाद
निसर्गात फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो
निसर्गात राहण्याची मजा घ्यायची असेल तर एक दिवस पदरवाडीला या तंबूत राहून बघाच
हा आहे शिडी घाट
पदरवाडीला श्री,गवारी करतात उत्तम राहण्याची व चुलीवरील चविष्ठ जेवण्याची सोय
आपले कुटुंब व मित्र परिवार घेऊन एकदा आवश्य भेट द्या. एकदा याल तर परत परत नक्की यावेसे वाटेल
सर्वांना येण्यासाठी सुरक्षित ठिकाण
एकदा येऊन तर पहा आयुष्य किती सुंदर आहे हे कळेल
श्री,काळूराम गवारी आपल्या राहण्याची व जेवणाची अल्प दरात उत्तम सोय करतात तरी निसर्ग प्रेमींनी संपर्क साधावा मोबाईल नंबर +91 86899 10333