भीमाशंकरला जाताना विसावा
भीमाशंकरला जाताना विसावा.... एकदा पावसाळा सुरू झाला की अनेक पर्यटक कोकणातील विविध धबधब्यावर निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जात असतात. अनेक हौशी पर्यटक आणि ट्रेकर या काळात भीमाशंकर चा रस्ता पकडतात. भीमाशंकरला जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत त्यापैकी खांडस भागातून गणपती घाट घोगराळ आणि शिडीचा घाट असे तीन पर्याय आहेत. याशिवाय पावली चा घाट आणि बैल घाट हेसुद्धा पर्याय आहेत. निसर्गाशी नातं जोडत डोंगरातून या मळलेल्या वाटेने जाताना जो आनंद येतो तो वर्णन करण्यापलीकडे आहे. वाटेत लागणारा पदरगड हे सुद्धा पर्यटकांचे एक फार मोठे आकर्षण आहे. फक्त पावसाळाच नाही तर जवळपास वर्षभर या वाटेने जाणारे आणि निसर्गाचा आनंद लुटणारी लोक आपल्याला पाहायला मिळतील. या संपूर्ण रस्त्यात अतिशय दाट जंगल आणि पावसाळ्याच्या दिवसात नयनरम्य धबधबे पाहून मन थक्क होते. रस्त्याने पर्यटक या धबधब्याचा आनंद लुटत मार्गक्रमण करतात. पदरगड सोडला किंवा शिडी घाट वर चढून आलं की एक आठ-दहा घरांची वस्ती लागते. भीमाशंकरच्या पदराला किंवा पदरगडाच्या शेजारी असणाऱ्या वस्तीला पदर वाडी असे नाव आहे. पदर वाडी हे ठिकाण भीमाशंकरला जाण्याचा